देशाने दीर्घ लढाईसाठी तयार राहिले पाहिजे : मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) करोनाविरुद्धची लढाई ही दीर्घ लढाई आहे. देशाला दीर्घ लढाईसाठी तयार राहिले पाहिजे. या लढाईत थकून चालणार नाही, तसेच हारूनही चालणार नाही. दीर्घ लढाई असूनही आम्हाला विजयी व्हायचे आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत विजयी होणे हाच एक आपला संकल्प आहे, असे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते आज भाजपच्या ४०व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

 

मोदी पुढे म्हणाले की, यापूर्वी युद्धाच्या काळात आपल्या माता-भगिनींनी देशकार्यसाठी स्वत:चे दागिने देऊ केले होते. आताची परिस्थितीही युद्धापेक्षा वेगळी नाही. हे मानवजातीला वाचवण्यासाठीचे युद्ध आहे. त्यामुळे भाजप कार्यकत्यांनी PM-CARES Fund मध्ये अधिकाअधिक देणग्या द्याव्यात. तसेच आणखी लोकांना त्यासाठी उद्युक्त करावे, असे पंतप्रधान मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांना सांगितले. करोनाविरुद्धची लढाई ही दीर्घ लढाई असल्याचे पंतप्रधान म्हणाले. देशाला दीर्घ लढाईसाठी तयार राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. या लढाईत थकून चालणार नाही, तसेच हारूनही चालणार नाही. दीर्घ लढाई असूनही आम्हाला विजयी व्हायचे आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत विजयी होणे हाच एक आपला संकल्प आहे, असे मोदी म्हणाले.

Protected Content