परीट धोबी सेवा मंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदी विवेक ठाकरे

vivek thakre niyukti

जळगाव प्रतिनिधी । येथील सामाजिक कार्यकर्ते विवेक ठाकरे यांची परीट धोबी सेवा मंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदी आज नियुक्ती करण्यात आली.

अखिल भारतीय धोबी महासमाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळाच्या पदाधिकार्‍यांची राज्यस्तरीय बैठक येथील मुंबई मराठी पत्रकार संघात आज दि.२० जुन रोजी पार पडली. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यासोबत संघटनेची प्रदेश कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. यात जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जनसंग्राम या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी एकमताचे निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारीणीमध्ये कार्याध्यक्षपदी गणेश जगताप (बीड),महासचिवपदी संजय भिलकर (नागपूर),वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून बन्सीलाल कदम (सांगली) आदींचा समावेश आहे. या नियुक्त्यांची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष बालाजीराव शिंदे यांनी केली.

दरम्यान, आजच्या बैठकीत राज्यातील धोबी समाजाच्या आरक्षणासहीत विविध प्रलंबित मागण्यांबाबत भाजपा सरकार उदासिन असल्याने अगामी काळात राज्यभरात धोबी समाज जनआंदोलन उभारेल असा निर्धार समाजाच्या राज्य कार्यकारीच्या बैठकीत आज करण्यात आला. बैठकीत राज्य शासनाच्या भुमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करून शासनाने धोबी समाजासह तत्सम छोट्या-छोट्या जाती समुहावर एकप्रकारे अन्यायच चालविल्यामुळे शासनाचा निषेध करून यापुढे राज्यभर जनआंदोलन उभारण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.

या बैठकीला संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष विजय देसाई, नागपूर शहराध्यक्ष मनिष वानखेडे,दत्तात्रय बननें,गोपी चाकर, उल्हास मोकळकर, युवा प्रदेशाध्यक्ष संजय वाल्हे, भास्कर चिंचुलकर, विलास गायकवाड, सुनिल खैरनार, आनंदराव शिंदे, सरदार पोवार, संभाजी सायकर, अँड. योगेश खैरनार, दत्ता वाघ, संजय टोपे, राजेंद्र देसाई आदी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!