गैरमार्गाने गाळे हस्तांतरण केल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान : नितीन लढ्ढा (व्हिडीओ)

6833061f 2113 412f b56f 6af574adf895

जळगाव (प्रतिनिधी) गाळे हस्तांतर करताना विहित शुल्क न भरता गैरमार्गाने गाळे हस्तांतरित केले जात असून त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते  नितीन लढ्ढा यांनी महापालिकेच्या स्थायी सभेत आज (दि२०) केला.

 

या सभेत  व्यासपीठावर महापालिका आयुक्त उदय टेकाळे, उपआयुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त लक्ष्मिकांत कहार आदी उपस्थित होते. यावेळी मनपा मालकीचे गाळे व्यापारी संगनमताने हस्तांतरित करीत असल्याने यात महापालिकेचे चार ते पाच कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. जर व्यावहारिक भूमिका घेऊन प्रस्ताव मंजूर केला तर हे नुकसान टाळता येऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आयुक्त टेकाळे यांनी मात्र यावर कोणतेही भाष्य करता येणार नसल्याचे सांगून कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, मेलेली जनावरे ओढण्याचे काम मानधन तत्वावर करणारे नंदू धाडे व अशोक सोनवणे यांना कायम करण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. यावर आयुक्त टेकाळे यांनी नियमानुसार यातून मार्ग काढू अशी ग्वाही यावेळी दिली. या दोघा कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यास सभागृहात मंजुरी देण्यात आली. यासह इतरही काही विषयांवर चर्चा करण्यात आली. लढ्ढा यांच्यासह भगत बालाणी, नितीन बरडे, सुनील वामनराव खडके, दिलीप पोकळे आदी सदस्यांनी यावेळी झालेल्या चर्चत सहभाग घेतला.

 

Protected Content