विटनेर येथे सर्पदंशाने मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

Cobra crime

जळगाव प्रतिनिधी । झोपेत संर्पदंश झालेल्या 13 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. याबाबत एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरती बंडू पवार (वय -13) रा. विटनेर ता. जळगाव ही आईवडीलांसह रात्री जेवण करून घरात झोपली होती. झोपेत असतांना रात्री सापने चावा घेतला. उंदीर चावला असावा असा भास आरतीला झाला होता. मात्र सकाळी तीला अत्यवस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सुशांत सुपे यांनी घोषीत केले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Protected Content