भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

Accident

जळगाव प्रतिनिधी । समोरुन येणाऱ्या भरधाव बसने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. मंगळवारी रात्री १० वाजता शिव कॉलनी जवळ हा अपघात झाला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, विजय शांताराम पाटील (वय ३२, रा.जळगाव) हा दुचाकीस्वार तरुण अपघातात गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी रात्री जळगावहुन तळई जाणाऱ्या एसटी बसने (एमएच ०६ एस ८६२३) विजय पाटील याच्या दुचाकीस (एमएच १९ सीजी ४१६२) धडक दिली. यात विजय गंभीर जखमी झाला असून तो बेशुद्ध अवस्थेत आहे. नागरीकांनी त्याला बेशुद्ध अवस्थेतच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, जळगाव आगाराच्या प्रमुख निलीमा बागुल यांनी या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात विजय पाटील विरुद्ध तक्रार दिली आहे. विजय पाटील या दुचाकी भरधाव चालवत असताना एसटी बसवर येऊन आदळला असे तक्रारीत म्हटले आहे. तर जखमी विजय पाटील हा बेशुद्ध असल्यामुळे अद्याप पोलिसांनी त्याचा जबाब घेतलेला नाही. सतीष डोलारे तपास करीत आहेत.

Protected Content