बाल न्याय कायद्याचे उल्लंघन करण्याऱ्यांवर कठोर कारवाई होणार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या बालगृहे, अनाथाश्रम चालविणे, बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवणे, त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना घडत असल्याने अनाधिकृत संस्था चालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात अनाधिकृत संस्था सुरु असून तसेच सामाजिक माध्यमांचा वापर करुन त्यावर काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांची छायाचित्रे प्रसिध्द करुन बाल न्याय कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास येत आहे तसेच समाजातील विविध स्तरावरील नागरीकांना भावनिक आवाहन करून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करीत असल्याचे आढळून येत आहे.

अशा अनधिकृत संस्थांचा शोध घेण्याच्या सुचना सर्व पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर बाल न्याय कायद्यातंर्गत कारवाही करण्यात येईल. जिल्हयामध्ये व ग्रामस्तरावर अनधिकृत संस्था आढळल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष (७३५०४१४७६८), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जळगाव (०२५७-२२२८८२८), तसेच चाईल्ड हेल्प लाईन १०९८ टोल फ्री (२४तास सेवा) येथे त्वरीत संपर्क साधावा. सदरच्या गैरप्रकारास आळा घालून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे

Protected Content