यावल नगर परिषदेत कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करावी; शिंदे गटाचे नेते नितिन सोनार यांची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील नगर परिषदेला मागील एक वर्षापासुन कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने यावल शहरवासियांच्या समस्यांचे व अडचणींचे निराकरण होत नसल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. शासनाने या ठिकाणी तात्काळ कायमस्वरूपी मुख्यधिकारी या पदावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्हा पुर्व विभागाचे उपसंघटक नितिन सोनार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल नगर परिषदला मागील एक ते दीड वर्षापासुन कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्या कारणाने या ठिकाणी प्रभारी मुख्याधिकारीकडे नगर परिषदचा कारभार असल्याने ते वेळेवर मिळत नसल्याने शहरातील नागरिकांचे विविध शासकीय काम व नागरी समस्यांचे वेळेवर निराकरण होत नसल्याने यावल नगर परिषदच्या कारभारावर मोठी नाराजी शहरवासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वारंवार नगर परिषदच्या फेऱ्या माराव्या लागत आहे. यावल नगर परिषदला कायमस्वरूपी मुख्यधिकारी अभावी यावल नगर परिषदचा पुर्ण कारभार वाऱ्यावर चालले असल्याचे प्रशासनाने तात्काळ कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमणुक करावी अशा मागणीचे निवेदनाव्दारे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार यांनी केली आहे.

Protected Content