वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात पेट्रोलिंग करत असताना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयीताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता अटक केली असून त्याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचे पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. राज उर्फ मनोज सुरेश शिंदे वय-३९, रा. रामपेठ वरणगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, वरणगाव शहरात पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख हे मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पेट्रोलिंग करत असताना त्याला संशयित आरोपी हा गावठी पिस्तूल बाळगत असल्याची गोपनिय माहिती मिळाली व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भवन आव्हाड यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रीतम पाटील, पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांनी कारवाई करत संशयित आरोपी राज उर्फ मनोज सुरेश शिंदे याला अटक केली. त्याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.