यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील बस आगारातील नवीन बस मिळण्याबाबत आणि नवीन बस स्थानक स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांनी आज २८ ऑगस्ट बुधवार रोजी जळगाव एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांना मागणीचे निवेदन दिले.
यावल बस स्थानक हे गेल्या आठ-दहा वर्षांपासून अतिशय विकट अवस्थेत आहे. ही अवस्था बदलून नवीन बस स्थानक तयार झाले पाहिजे त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून यावल बस स्थानकाचे नूतनीकरण करण्यास लवकरात लवकर मंजूरी देण्यात यावी आणि नवीन ८० बसेस उपलब्ध देण्यात याव्या. प्रत्यक्षात यावल बस आगारात ५२ बसेस आहे. त्यातील ४० बसे जुन्या व कमकुवत अवस्थेत आहे. या धोकादायक बसमध्ये प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याकडे जळगाव महामंडळ व विभागीय नियंत्रण अधिकारी यांनी लक्ष देऊन यावल तालुक्यातील एसटी बसेस काढून नवीन बस यावल आगारात द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जळगाव महामंडळाचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांना निवेदनाव्दारे केली. या मागणीची तत्काळ दखल न घेतल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर यांच्यासह पक्षाचे जिल्हा संघटक राजेश निकम, साजन पाटील , तालुका अध्यक्ष मुकेश बोरसे, किशोर नन्नवरे , गौरव कोळी, शुभम चौधरी, गिरधर मिस्त्रि, कैलाश मिस्त्रि आदी पदधिकारी उपस्थित होते.