ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गावठाण सर्वेक्षण

0
1

अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी  | राज्य आणि जिल्हा प्रशासन निर्देशानुसार अमळनेर तालुक्यात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गावठाण सर्वेक्षणास प्रशासन स्तरावरून अधिकाऱ्यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

अमळनेर तालुक्यात प्रथमच कन्हेरे गावापासून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गावठाण सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अमळनेर उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, कन्हेरे गावच्या प्रथम नागरिक सरपंच छायाबाई पाटील, तालुका भुमी अभिलेख विभागाचे अधिकारी, कर्मचारी व गावातील ग्रामस्थ आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.