Home Agri Trends सर्वोत्कृष्ट कांदा उत्पादन : वासुदेव चौबे यांचा जैनतर्फे सत्कार

सर्वोत्कृष्ट कांदा उत्पादन : वासुदेव चौबे यांचा जैनतर्फे सत्कार

0
28

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने कांद्याचे सर्वोत्कृष्ट उत्पादन घेतल्याबद्दल वासुदेव चौबे यांचा जैन समूहातर्फे पारितोषीक देऊन सत्कार करण्यात आला.

वासुदेव चौबे यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून कांद्याचे विक्रमी आणि अतिशय दर्जेदार असे उत्पादन घेतले आहे. या कार्याचा गौरव जैन इरिगेशनतर्फे करण्यात आला. आज एका शानदार कार्यक्रमात त्यांना २१ हजार रूपये आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानीत करण्यात आले.

या कार्यक्रमाला जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अतुलभाऊ जैन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. वासुदेव चौबे यांनी आपल्या सौभाग्यवतींसह हा पुरस्कार स्वीकारला. जैनतर्फे मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून अभिनंदन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound