हभप संत प्रसाद महाराज यांना बंधूशोक : विकासदादा महाराज कालवश !


अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थानाचे प्रमुख ज्येष्ठ विश्वस्त आणि विद्यमान मठाधिपती हभप प्रसाद महाराज गुरु ज्ञानेश्वर महाराज यांचे ज्येष्ठ बंधू विकास दादा ज्ञानेश्वर महाराज देव यांचे दुःखद निधन झाले.

विकासदादा महाराज देव यांचे निधन 20 फेब्रुवारी 2025 रोजी गुरुवारी रात्री नाशिक येथे वयाच्या 76व्या वर्षी झाले. त्यांच्या निधनाने धार्मिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

त्यांचे पार्थिव नाशिकहून अमळनेर येथे आणण्यात आले असून, अंत्ययात्रा आज (21 फेब्रुवारी) सायंकाळी 4 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून वाडी चौक, अमळनेर येथून निघणार आहे. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी सर्व स्तरांतून श्रद्धांजली वाहिली जात आहे.