पोलीस प्रशासनाकडून विजय सराफ यांचा सन्मान !


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ शांतता समिती सदस्य विजय त्र्यंबक सराफ यांना पोलीस प्रशासनाने सन्मानित केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला दिलेल्या उल्लेखनीय सहकार्याबद्दल त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

हा सत्कार सोहळा नुकताच जळगाव येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमात यावल येथील विजय सराफ यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या जवळपास ३५ शांतता समितीच्या सदस्यांचा गौरव करण्यात आला. आपापल्या गावात आणि शहरात बंधुभाव व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते आणि अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

विजय सराफ यांना पोलीस प्रशासनाकडून सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्व सहकारी शांतता समिती सदस्य आणि विविध स्तरांवरून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. या सन्मानामुळे समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळाले आहे.