पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा नागरी व पगारदार नोकरांच्या पतसंस्थांचे सह फेडरेशन मर्या., जळगाव या जिल्हा फेडरेशनच्या २०२५-२०३० या पंचवार्षिक निवडणुकीत पारोळा तालुक्यातून श्री दर्पण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय नावरकर यांची अविरोध निवड झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने ही निवड निश्चित झाली.
जिल्हा फेडरेशनमध्ये प्रत्येक तालुक्यातून एक संचालक, महिला प्रतिनिधी २, ओबीसी, वि.जा.भ.ज, अनुसूचित जाती-जमाती व नोकरदार प्रतिनिधी अशा एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. विजय नावरकर यांच्या बिनविरोध निवडीमुळे त्यांचे नेतृत्व कौतुकास्पद ठरले आहे.
या निवडीबद्दल लाडशाखीय वाणी समाज मंडळ, दत्तलिला बहुउद्देशीय मंडळ, दर्पण नागरी पतसंस्था, गृहतारण संस्था अध्यक्ष, तसेच अशोक वाणी, भुपेंद्र मराठे, व्यापारी मंडळाचे संचालक अशोक लालवाणी, डॉ. रविंद्र नावरकर, लोकमान्य पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. विश्वास कोळी सर, भागवत चौधरी, चंद्रकांत शिंपी आणि अनेक मान्यवरांनी विजय नावरकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.