धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पष्टाने गावातील रस्त्यावर विद्युत तारा लोंबकळत असल्याने येथील शेकडो ग्रामस्थांना मरणयातना भोगून जीवन जगावे लागत आहे. वीज महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार दिसून येत आहे.
पष्टाने गावात जवळून विद्युत वाहक तारा जमिनीपासून काही अंतरावर लोंबकळल्या आहेत. त्यामुळे परिसरातील खेळणारी मुले व मोठी वाहने तारांच्या संपर्कात येतील, असा धोका आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी अनेक दिवसांपासून तारा ताठ करण्याची मागणी करीत आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांचा जीव धोक्यात आला आहे. सोबत अवाजवी बिले आल्यानंतर ग्राहक विज बिल भरणा करत नसल्याने विज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मिटर करण्यासाठी येत असल्याची देखील येथील ग्रामस्थांनी केली असून याकडे विज वितरण कंपनी विभागाने गांभीर्य लक्षात घेवून विद्यूत तारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.