जिल्हा परिषदेत ममुराबाद, आसोदातील महिलांचे ठिय्या आंदोलन (व्हिडीओ)

Jilha Parishad

जळगाव प्रतिनिधी । तालुकयातील आसोदा, ममुराबद म्हसावद व इत्यादी गावांमध्ये सरकारी जागेवर गेल्या २० ते २५ वर्षांपासून राहणाऱ्यांना घरकुल योजनेंतर्गत हक्काचे घर मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन यांच्यासह गरजू महिलांनी जिल्हा परीषद कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन केले. तर विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वांसाठी घरे या शासनाच्या निर्णयानुसार तालुक्यातील आसोदा, ममुराबाद, म्हसावद आदी गावामध्ये गेल्या २० ते २५ वर्षांपासून गावात राहणाऱ्या गरजू मजूर महिलांना हक्काचे घर मिळावे यासाठी गटविकास अधिकारी यांच्या निवेदने देवून मागणी केली आहे. यासाठी गरजूनी ऑनलाईन नोंदणी देखील केली आहे. दरम्यान देशात व राज्यात भूमिहीन भाडेकरूंसाठी पंतप्रधान आवास योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. मात्र आसोदा व ममुराबाद येथील ग्रामसेवक हे कार्यालयात हजर राहत नसल्याचे नोंदणीचा अर्ज स्विकारायला ग्रामपंचायत तयार नाही. दोन्ही गावांना कायमस्वरूपी ग्रामसेवकांची नियुक्ती करावी, आसोदा गावात मनरेगाच्या माध्यमातून गावात ४ लाखांचे काम देण्यात आले आहे. मात्र कामाच्या ठिकाणी मजूरांना पिण्याचे पाणी देखील उपलब्ध करून दिलेले नाही. घरकुल बांधण्यासाठी दीड लाख रूपयांचे अनुदान मजूरांच्या खात्यावर जमा करावे. जॉबकार्ड धारकांना बेरोजगारी भत्ता मिळावा यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परीषदेसमोर गरजू महिलांना ठिय्या आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनावर प्रकाश चौधरी, विनोद अढाळके, वंदना सपकाळे, गोकूळे कोळी, जयश्री सोनवणे, कुसुम कोळी, अनिता पाटील, रंजना कोळी, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/488229801852239/

Protected Content