वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन

bhusaval 5

भुसावळ प्रतिनिधी । गेल्या भरपूर दिवसांपासून अधुनमधून वीजदाब कमी जास्त होत असल्याने विद्युत उपकरणांवर त्याचा परिणाम होत आहे. यामुळे ग्राहक वैतागले असून परिसरात पुरेशा वीजपुरवठा करा, यासाठी महावितरणचे मुख्य अधिकारी हजर नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना आज दि. 26 जुलै रोजी निवेदन देण्यात आले असून विद्युत उपकरणे खराब होत असल्यामुळे नुकसान भरपाई महावितरणाने करावी असा इशारा प्रा. धिरज पाटील यांनी यावेळी दिला आहे.

विभागातील जळगाव रोड परिसरातील मोहित नगर, अयोध्या नगर, जामनेर रोड परिसरातील तुकाराम नगर विस्तारीत भागात महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका वीज ग्राहकांना बसत आहे. वीजेचा दाब व्यवस्थित नसल्याने इलेक्ट्रिक उपकरणे, बोअरवेल सु-स्थितीत चालत नाहीत तसेच नागरिकांच्या इतर सोयी सुविधांबरोबरच पाण्यासाठी ही भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर उपकरणे बिघडण्याची शक्यता जास्त अधिक वाढली आहे. लोडशेडिंग बंद झाल्याचे सांगितले जात असले तरी अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने ट्युबलाईट, टीव्ही, पंखे इत्यादी विविध विद्युत उपकरणे बिघडत आहेत. नवीन वीज मीटर मुळे आधीच वीज बिल फुगले आहे. उपकरणे खराब झाल्यास महावितरण जबाबदार राहील व ते नुकसान भरपाई महावितरणलाच द्यावी लागेल असा इशारा प्रा. धिरज पाटील यांनी दिला.  विस्तारित भागातील नागरिकांना प्रत्येक वेळेस वीज, पाणी, रस्ते यासाठी लढा द्यावा लागतो, हद्दीमुळे विकास होणे कठीण झाले आहे. मागील ५ वर्षांपासून विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्या परंतू मागण्या मान्य झालेला नाहीत. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. यावेळी प्रा.धिरज पाटील, रमेश भोई, विशाल ठोके, हुना कोळी, विजेंद्र नेहते, बाळकृष्ण डोळे, मनोज तायडे, अशोक फेगडे, निखिल बऱ्हाटे, दिगंबर चौधरी, देविदास पाटील, किशोर धोटे व नागरिक उपस्थित दिले.

Protected Content