पाचोरा येथे काँग्रेसचे विविध मागण्यांसाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

पाचोरा प्रतिनिधी । लॉकडाउन मध्ये व्यापारी वर्गाची वेळ बदलवुन मागिल काळातील जळगाव पॅटर्न लावावा वेळ ११ ते ५ करुन नाभिक समाजाला परवानगी द्यावी यांसह विविध मागण्या काँग्रेस पक्षातर्फे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, कोरोना महामारीत व्यापारी बर्बाद झाले आहे. आर्थिक व्यवहार पुर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता केली आली आहे. मात्र वेळ सकाळी ७ ते दुपारी २ ची देण्यात आली आहे. त्यामुळे ही वेळ मागिल काळात ज्या प्रकारे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होती. तोच जळगाव पॅटर्न राबविण्यात यावा. यामुळे व्यापारी पेठेत गर्दी कमी होईल आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाला मदत होईल. अशी मागणी कॉग्रेसने करीत यासोबतच नाभिक समाजावर अन्याय होत असुन उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने कोरोना नियमावली देऊन नाभिक समाजाला दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. ही मागणी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्यासह पदाधिकारी यांनी करीत निवेदन दिले आहे.

सदरचे निवेदन हे उप विभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांना देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस इरफान मनियार, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अंबादास गिरी, तालुका युवक अध्यक्ष संदीप पाटील, महिला आघाडीच्या अॅड मनिषा पवार, कुसुम पाटील, शिला सुर्यवंशी, सोशल मिडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, एन. एस. यु. आय. चे साई पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी प्रातंअधिकारी राजेंद्र कचरे यांना मागिल जळगाव पॅटर्न कसा योग्य होता यावर चर्चा झाली. उप विभागीय धिकारी राजेंद्र कचरे पाटील यांनी कॉग्रेस शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, आपली मागणी योग्य असुन तात्काळ ही जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठवुन चर्चा करुन लवकरच अमंलात कशी येईल यावर विचार केला जाईल. त्यातच नाभिक समाजाचे दुकाने मागिल काळातील नियम व अटी शर्ती करून कसे सुरु केले जातील हे देखील जिल्हाधिकारी यांना सांगितले जाईल. असे आश्वासित कॉग्रेस शिष्टमंडळाला केले. सदर निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Protected Content