महामंडलेश्वर जनार्दन महाराज विदेश दौऱ्यावर (व्हिडीओ)

janrdan

फैजपूर प्रतिनिधी । येथील सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज 19 जुलै येथे 12 ऑगस्ट दरम्यान सतपंथ धर्माच्या प्रचारासाठी विदेश दौऱ्यावर गेले आहेत.

याठिकाणी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज हे तेथील सतपंथ परिवारातील भाविकांना धर्म प्रचार विदेशात वाढविली पाहिजे व याचाच प्रसार मोठ्या प्रमाणात करुया हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज दरवर्षी विदेशात धर्म प्रचारासाठी जात असतात. यावर्षी देखील 19 जुलै ते 22 ऑगस्ट पर्यंत महाराज दौ-यावर असून त्यांचे हे चौथे वर्ष आहे. भाविक दरवर्षी महाराजांची आतुरतेने वाट बघत असतात. एक नवीन चैतन्य त्या विदेशात निर्माण होत असल्यामुळे विदेशातील भाविक पूर्ण तन-मन-धनाने देवाचे नामस्मरण करतात. तसेच वेगवेगळ्या पद्धतीने महामंडलेश्वर महाराज यांचे स्वागत तेथील भाविक-भक्त करत असतात. महामंडलेश्‍वर महाराजजी महिन्यांच्या विदेश दौऱ्याचे नियोजन हे 2 महिने आधीपासूनच विदेशातील भाविक भक्त करीत असतात. यात रोज सकाळ संध्याकाळ नेमून दिलेल्या ठिकाणी सत्संगाचे आयोजन करण्यात येते. तसेच येत्या 28 जुलै रोजी रविवारी फ्लोरिडा या ठिकाणी भव्य सत्संगाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

Protected Content