चैतन्य तांडा येथे १२६ विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील चैतन्य तांडा येथे जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते सातवी वर्गातील १२६ विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांच्या हस्ते करण्यात आले.

चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या १२६ विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत गणवेशाचे वाटप गटशिक्षणाधिकारी विलास भोई व उपसभापती सुनील पाटील यांच्या हस्ते मंगळवार रोजी करण्यात आले. ३९,३०० रूपयांचा निधी १३१ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्याने गणवेश वितरीत करण्यात आले. दरम्यान १२६ विद्यार्थ्यांना हे वाटप झाल्यामुळे पाच विद्यार्थ्यांचे पैसे परत पाठविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्र प्रमुख नारायण राठोड हे होते. यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापक अजित पाटील यांनी तर आभार सुनील देवरे यांनी मानले. यावेळी माजी चेअरमन दिनकर राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, सदस्य भावलाल चव्हाण, राजेंद्र चव्हाण, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण राठोड, उपाध्यक्ष ज्योती पवार, जवार राठोड (माजी ग्रामपंचायत सदस्य), शिक्षक वृंद कुमावत, चौधरी, राजेंद्र पाटील, ग्रामस्थ
साहेबराव राठोड, पदम तवर, प्रेम राठोड,थानसिंग राठोड, दत्तु पवार, साईलाल राठोड आदी उपस्थित होते.

Protected Content