विद्यार्थ्यांची कोणतीही शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी तयार – प्रतापराव पाटील

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | यशस्वी जीवनासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे चांगल्या क्षेत्रात करिअरची निवड करुन यशस्वी व्हावे. विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी कोणतीही ही अडचण अाल्यास मला येऊन भेटल्यास ती मी नक्कीच सोडवेल असे मी आमदार गुलाबराव पाटील यांच्यावतीने आश्वासन देतो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले.

पाळधी येथील स. नं. झंवर विद्यालयात ५ जुलै राेजी दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगाैरव साेहळा झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष सुनील झंवर, मुख्याध्यापिका शाेभा ताेतला उपस्थित हाेते. या मान्यवरांच्या हस्ते शाळेत प्रथम मयुुरी रवींद्र पाटील, द्वितीय महेेश विजय चाैधरी, तृतीय हेमांगी सुकलाल सपकाळे अालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार ट्राॅफी, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन करण्यात अाला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रतापराव पाटील यांनी ११ वी व १२ वीच्या प्रवेशाबाबत माहिती दिली. मी देखील झंवर विद्यालयाचा माजी विद्यार्थी असून या शाळेने मला खूप काही दिले अाहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाे तुम्ही देखील उत्तम प्रकारे शिक्षण घेऊन खूप माेठे व्हा. यंदा ही शाळेने यशाची पंरपरा जपून दहावीचा चांगला निकाल लावला ही शिक्षक व शाळेच्या चांगल्या कामाची पावती आहे असे सांगितले.

सुनील झंवर यांनी झंवर विद्यालयाचा यंदा दहावीचा निकाल ९२ टक्के लागला ही काैतुकास्पदबाब अाहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो खूप शिका, चांगले उच्च शिक्षण घेऊन यशाचा शिखर गाठा. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी बाहेर जाताना काळजी घ्यावी. वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा व शाळेचा लाैकिक वाढवावा असे सांगितले. डी. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आर. एस. भगत यांनी आभार मानले. यावेळी शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित हाेते.

Protected Content