स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे संत गाडगेबाबा यांचे कार्य समाजाला दिशा देणारे : अनिल महाजन


अमळनेर (प्रतिनिधी) संत गाडगे महाराजांविषयी बहुजन समाजात कमालीचा आदर भाव आहे. त्यांनी महाराष्ट्रात केलेले लोकजागृतीचे कार्य मोलाचे व समाजाला दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले. ते संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी सर्वप्रथम संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले प्रतिमेला माल्यार्पण ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी केले. व्यासपीठावर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के , शिक्षक आय आर महाजन, एस.के.महाजन,एच.ओ.माळी, लिपीक एन.जी.देशमुख होते. यावेळी श्री.महाजन पुढे म्हाणाले की, संत गाडगे महाराज यांनी दिलेला स्वच्छतेचा मूलमंत्र केलेली स्वच्छतेची जनजागृती त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लोकांमध्ये स्वच्छतेचा संदेश देणारे एकमेव महान संत गाडगे बाबांचे नाव घेतले जाते. गाडगे बाबांचे विचार आजच्या तरुण पिढीने अंगीकारले तर देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले. याप्रसंगी शिक्षक एच.ओ. माळी, जेष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के संत गाडगेबाबा आणि अनिष्ट चालीरीती अंधश्रद्धा याबाबत समाजजागृती करून लोकशिक्षणाचे व्रत स्विकारले, असे सांगून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ईश्वर महाजन यांनी केले. तर आभार एस.के.महाजन यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Add Comment

Protected Content