ब्राम्हणेच्या सरपंचा ज्योत्स्ना निकम यांचा गौरव

शिंदखेडा (प्रतिनिधी) – तालुक्यातील ब्राम्हणे ग्रामपंचायतीच्या सदस्या ज्योत्स्‍ना निकम यांना उदयोन्मुख नेतृत्व पुरस्कार कार्यकम केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांच्याहस्ते देण्यात आला. सौ. निकम यांना पर्यावरण पुरस्कारामुळे जबाबदारी वाढल्याने २ हजार वृक्षांची लागवड करून संवर्धन करण्यात येत आहे. गावहद्दीत खाजगी उद्योगांना मंजुरी व बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला हातभार लावण्यात येतो. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र कौतूक होत आहे.

गावात उपलब्ध करून दिल्यात विविध सुविधा
तालुक्यातील बाम्हणे गाव दुष्काळी भागात मोडते. परंतु तरीही गावात नियमित व शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी गावापासून पाच कि.मी. अंतरावरील तापी नदीचे पाणी काठावर उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात स्वच्छ करून पाईपलाईनद्वारे आणले आहे. सांडपाण्यासाठी गटारी असून भूमिगत गटारीही प्रस्तावित आहेत. गावात वीजपुरवठ्यासाठी हायमास्ट दिव्यांची सोय केली असून सौरऊर्जेवर चालणारे दिवे जास्तीत जास्त बविण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे. गावात अंगणवाडीपासून बारावीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था असून सरपंच ज्योत्स्ना निकम स्वत: माध्यमिक शाळेत शिक्षिका असल्याने शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचा सातत्याने प्रयत्न होतो. विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांत सहभागासाठी प्रोत्साहित केले जाते. गावात स्वच्छतेसाठी घंटागाडी उपलब्ध केली आहे. ग्रामपंचायतीचे स्वतंत्र मंगल कार्यालय, सुसज्ज सार्वजनिक वाचनालय आहे. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अक्षयतृतीयेला यात्रा भरविली जाते.

Add Comment

Protected Content