मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोल्हापूर येथील विधानसभा पोट निवडणूकीत काँग्रेसचे उमेदवार जयश्रीताई जाधव यांनी विजय संपादन केल्यानंतर मुक्ताईनगरातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज हवाई अतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील, प्रदेश प्रवक्ते ॲड.अरविंद गोसावी, मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, छोटू भोई शिवसेना तालुकाप्रमुख, प्रवीण चौधरी, तालुका कार्याध्यक्ष राजू जाधव, ज्येष्ठ नेते बि.डी.गवई, तालुका उपाध्यक्ष ॲड.राहुल पाटील, निखिल चौधरी, बाळू कांडेलकर, सुरेश भोलाणे, sc विभाग तालुकाध्यक्ष निलेश भालेराव, शहराध्यक्ष रवी जयकर, समाधान पाटील, जफर खान, आलम शहा, शेख रईस, शेख खलील, नबु जमदार, राजू वानखेडे, नाना बोदडे, वसीम शेख, अरिफ रब्बानी यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.