Home Cities जळगाव आ. गिरीश महाजन यांच्या महापालिकेतील बैठकीकडे लक्ष

आ. गिरीश महाजन यांच्या महापालिकेतील बैठकीकडे लक्ष

0
41

जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिका निवडणूक झाल्यानंतर दोन वर्षांनी आ. गिरीश महाजन हे आज जळगाव महापालिकेत बैठक घेत असून यात ते नेमके काय सांगणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या असुविधांमुळे जळगावकर त्रस्त झालेले आहेत. रस्ते, गटारी आदींसारख्या मूलभूत सुविधा देण्यसा सत्ताधारी अपयशी ठरल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. विशेष करून पावसामुळे रस्त्यांची अतिशय दैन्यावस्था झालेली आहे. तर कचर्‍यातील कथित कमिशनगिरीमुळे नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झालेली आहे.

या पाश्‍वभूमिवर, आज दुपारी १२ वाजता माजी मंत्री गिरीश महाजन मनपात बैठक घेणार आहेत. यात प्रमुख पदाधिकारी व अधिकार्‍यांकडून आढावा घेतील. आ. महाजन यांनी महापालिका निवडणुकीत जळगावकरांनी दिलेल्या आश्‍वासनांचे पालन केले नसल्याने ते आज आपल्या सहकार्‍यांना नेमक्या काय सूचना देणार याकडे आता सर्व जळगावकरांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound