अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।अमळनेर शहरातील एका भागात राहणाऱ्या महिला ही आठ वर्षांपुर्वी अल्पवयीन असतांना तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून तिने मुलाला जन्म दिला. आणि लग्नास टाळाटाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी १७ मार्च रोजी दुपारी दीड वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील एका भागात पिडीत महिला ही आपल्या मुलासोबत वास्तव्याला आहे. दरम्यान २०१७ मध्ये पिडीत महिला ही अल्पवयीन असतांना संशयित आरोपी गौरव विजय पाटील याने लग्नाचे आमिष दाखवत पिडीतेला पळवून औरंगाबाद जिल्ह्यात घेवून गेला. त्यावेळी तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आला. या अत्याचारातून पिडीत मुलगी ही गर्भवती राहिली. त्यामुळे पिडीतेने गौरवला लग्न करण्याचा आग्रह धरला. पण गौरवने लग्न करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पिडीतेने अत्याचारातून मुलाला जन्म दिला. तरी देखील गौरवने लग्न करण्यास नकार ते जातीवाचक शिवीगाळ केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अखेर पिडीत महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून गौरव पाटील याच्या विरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवारी २७ मार्च रोजी दुपारी दीड वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गौरव विजय पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विनयक कोते हे करीत आहे.