उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रपतीपदाची निवडणूकीनंतर आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली असून ६ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरच्या माध्यतामून दिले आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपणार आहे. उपराष्ट्रपदी पद हे राज्यसभेचे पदसिध्द अध्यक्ष असतात. निवडणूकीच्या वेळी राज्य सभेचे महासचिव हे राष्ट्रपती निवडणूक निर्णय अधिकारी असतात तर लोकसभेचे महासचिवहे उपराष्ट्रपती हे निवडणूकीचे निवडणूक निर्णय अधिकारी असतील. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रपती निवडणुकीसोबत उपराष्ट्रपती पदाची निवडणूकही पार पडणार आहे. आणि संसदेतच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे.

भारतात उपराष्ट्रपती राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग किंवा अन्य कारणांमुळे राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतात.

 

Protected Content