द्रौपदी मुर्मू यांची विजयाकडे वाटचाल !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून यात एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लवकरच याबाबत निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे द्रौपदी मुर्मू तर विरोधकांतर्फे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्यात लढत झाली. १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून संसद भवनात मतगणना सुरु झाली. यातील पहिल्या फेरीत मुर्मू यांना ५४० तर यशवंत सिन्हा यांना फक्त २०८ मते मिळालीत. यामुळे मुर्मू यांचा विजय जवळपास निश्‍चीत झालेला असून लवकरच यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

आता द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्या विजयी झाल्या तर त्या दुसर्‍या महिला राष्ट्रपती होतील. तर प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती होत्या. आणि आजच्याच दिवशी १५ वर्षांपूर्वी त्या राष्ट्रपतीपदी निवडून आल्या होतया. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल २४ जुलै रोजी समाप्त होणार आहे. यानंतर मुर्मू यांचा शपथविधी होणार आहे.

Protected Content