Home राज्य दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

0
105

exam 390x220

पुणे प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२० मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये दहावी बारावीच्या परीक्षा होणार आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळात या परीक्षा होणार आहेत. येत्या 18 फेब्रुवारी २०२० पासून बारावीच्या लेखी परीक्षांना सुरुवात होणार आहे. तर 3 मार्च २०२० पासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. बारावीच्या परीक्षा या 18 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा ही 3 मार्च २०२० पासून 23 मार्चपर्यंत होणार आहे.


Protected Content

Play sound