पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशातील जनतेशी संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मोदींनी चर्चा केली होती. त्यामुळे आज ते काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

 

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करत ही माहिती दिली. आपल्या संबोधनादरम्यान आणखी नवा निर्णय घोषित करतील का, देशातील आर्थिक स्थितीला उभारी देण्यासाठी ते काही उपाय योजना सूचवतील का, किंवा काही ठिकाणी ते लॉकडाउन शिथील करतील का, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पंतप्रधानांच्या संवादादरम्यान मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोना संकटातून मार्ग काढण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. देशात लागू असलेला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपणार आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेली चर्चा आणि त्या चर्चेचा एकंदर सूर पाहता देशातला लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.

Protected Content