Home Cities पारोळा स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त पारोळ्यात ‘जनसेवा सप्ताह’ 

स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त पारोळ्यात ‘जनसेवा सप्ताह’ 

0
20

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त पारोळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ‘जनसेवा सप्ताह’ विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरओ प्लांटचे उद्घाटन यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादनाने झाली. यानंतर किसान महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. समाजासाठी रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यात युवकांनी पुढाकार घ्यावा, असा संदेश यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिला. जनसेवा सप्ताहाच्या निमित्ताने परिसरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने आरओ प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. स्व. अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख विचारांचा वारसा जपत समाजोपयोगी उपक्रम राबविणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ. शांताराम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रोहन दादा, तालुकाध्यक्ष संतोष महाजन, बाजार समितीचे संचालक मनोराज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य हिम्मत आबा, बाजार समितीचे उपसभापती बबन दादा, संचालक निंबा आबा, संभाजी जिभाऊ, सुनील रामोशी, योगेश रोकडे, कपिल चौधरी, ललित सोनवणे, लोकेश पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनसेवा सप्ताहांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सर्व उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासारख्या उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा आदर्श समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धारही व्यक्त केला.


Protected Content

Play sound