खा. संजय राऊत यांना ईडीचे समन्स

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला असतांनाच आता खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीचे समन्स आल्याचे वृत्त आहे.

खासदार संजय राऊत यांनी एकनिष्ठपणे मातोश्रीची बाजू लाऊन धरली आहे. त्यांनी अतिशक आक्रमकपणे शिवसेनेची भूमिका मांडली असतांना एकनाथ शिंदे यांच्यासह फुटीर गट आणि तसेच भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अर्थात, आज तरी संजय राऊत यांच्याकडून फक्त तेच आक्रमक बाजू मांडतांना दिसून येत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, त्यांना ईडीचे समन्स आल्याची माहिती समोर आले आहे.

अलीबाग येथील जमीनीच्या प्रकरणात खासदार संजय राऊत यांना समन्स बजावण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या नोटीसीत त्यांना उद्या म्हणजे दिनांक २७ जून रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. या संदर्भात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी आपल्याला अद्यापही नोटीस मिळालेली नसल्याचे सांगितले. जर नोटीस मिळालीच तर आपण वेळ मागून घेऊ. कारण उद्या माझ्या पूर्वनियोजीत बैठका असल्याची माहिती देखील त्यांनी याप्रसंगी नमूद केले आहे.

Protected Content