यावलमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

यावल प्रतिनिधी | शहर शिवसेना व युवासेनेच्या वतीने हिंदूहृदयसम्राट, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त यावल शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शहर शिवसेनेच्या व युवासेनेच्या वतीने रविवार, दि.२३ जानेवारी रोजी हिंदूहृदयसम्राट, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त यावल शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी नऊ वाजता शिवसेना कार्यालयात शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता यावल शहरात विविध ठिकाणी गरजूंना अन्नदान वाटप करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव बघता या पार्श्वभुमीवर कार्यक्रमास उपस्थित राहतांना सर्वांनी मास्क वापरत व सोशल डिस्टंसिंगचे पालन करून काळजी घेण्याचे आवाहन यावल शहर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांनी केले असून सर्व शहरातील शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकारी यांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन शहर उपप्रमुख संतोष धोबीसह शहर शिवसेना व युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content