पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज १९ फेब्रुवारी… अवघ्या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाई देवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा शासकीय अभिषेक जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाला . तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार यांच्या हस्ते जन्म सोहळा संपन्न झाला. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शासकीय शिवजयंतीला किल्ले शिवनेरीवर फक्त पास धारकांनाचं प्रवेश असणार आहे.
शिवजन्मोत्सव निमित्ताने शिवनेरी किल्ल्यांवर विविध कार्यक्रमाचे आयोजन
1 year ago
No Comments