अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धा; ७८ विद्यार्थ्यांचा सहभाग !


जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज मंडळ क्रमांक १ यांच्यातर्फे शुक्रवारी ३० मे रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्कॉलर इंग्लिश मीडियम स्कूल, काळे नगर, शिवाजीनगर, जळगाव येथे सकाळी १० वाजता निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

या स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी महाराज मंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष व्यवस्था केली होती. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासोबत निबंध लिहिण्यासाठी पेज, एक सुंदर पेन, आणि पिण्याच्या पाण्याची बाटली असे बक्षीस स्वरूपात देण्यात आले.

या स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज मंडळ क्रमांक १ परिसरातील ७८ विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. याप्रसंगी जळगाव शहराचे आमदार श्री. राजूमामा भोळे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपकभाऊ सूर्यवंशी, भाजपा मंडळ क्र. १ चे अध्यक्ष आनंद सपकाळे, तसेच जयेश भावसार, शिरीष तायडे, संजय शिंपी, उमेश देशपांडे, राहुल संकत, दिपक सुरळकर, तुषार सूर्यवंशी, नैनाताई दुसाने, चित्राताई मालपाणी, ज्ञानेश्वर आळसुर, जयवंत चव्हाण, बंटी भारंबे, योगेश पाटील, सोहम खडके, शुभम विचवेकर आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची माहिती मिळाली, तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळाला.