संविधान बचाव मोर्चासाठी विविध समित्या गठीत

morcha 5

 

जळगाव (प्रतिनिधी) संविधान बचाव नागरी कृती समितीच्या वतीने दि. ७ जानेवारी रोजी संविधान बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा शांततापूर्वक व अहिंसक मार्गाने व्हावा म्हणून आज कृती समितीच्या झालेल्या बैठकीत विविध समित्या गठीत करण्यात आल्यात.

 

संविधान बचाव मोर्चा कायदा आणि सुव्यवस्था पाळत शांततापूर्वक व अहिंसक मार्गाने पूर्ण व्हावा यासाठी आज संविधान बचाव नागरिक कृती समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतीभ शिंदे, मुस्लीम मंचचे फारुख शेख, मौलाना आझाद मंचचे अ.करीम सालार,कृती समितीचे मुकुंद सपकाळे, मराठा क्रांती मोर्चाचे विनोद देशमुख डॉ.राजीव अहमद आदींनी मोर्चा संबंधी मार्गदर्शन करून विविध समित्या स्थापन करण्यात आल्यात. त्यात प्रचार व प्रसार समिती कायदा आणि सुव्यवस्था समिती, पार्किंग समिती, स्वयंसेवक समिती, स्टेज व्यवस्था इत्यादी समित्या गठीत करून कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या बैठकीस अयाज अली, राजेश पाटील, प्रा. प्रीतीलाल पवार,. अशफाक पिंजारी, चंदन बी-हाडे , सुधाकर पाटील, शिवराम पाटील, समाधान सोनवणे, भारत सोनवणे, योगेश पाटील, आनंदा तायडे, पन्नालाल पारधी, डॉ. जावेद शेख, यशवंत घोडेस्वार, अनिल माळी, भारत ससाणे, गमीर शेख , गुरुनाथ सैंदाणे, अहमद तडवी, सतीश धनगर, गौतम सोनवणे, प्रा. चंद्रमणी लभाने, प्रा. के.के. वळवी, अलफैजपटेल, सतीश सुर्वे, मिलिंद सोनवणे, देविदास पारधी आदी उपस्थित होते.

Protected Content