एरंडोल येथे ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राचे उद्घाटन

 

एरंडोल प्रतिनिधी । येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष उज्वला पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील सदस्य तथा ग्राहक पंचायतीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष विकास महाजन हे होते. यावेळी एरंडोल तालुका ग्राहक पंचायत अध्यक्ष आरती ठाकुर, जिला कार्यकारिणी सदस्य शोभा साळी, एरंडोल तालुका महिला आघाड़ी प्रमुख मीनाक्षी पाटील, माजी नायब तहसीलदार विलास मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

शासन परिपत्रकानुसार ग्राहक जागरण पंधरवडा निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण ही यावेळी करण्यात आले.

निबंध स्पर्धेचे विजेते:- रूपाली पाटील, मालती वाणी, शालिनी कोठावदे, निलीमा मानुधने.

नाट्य अभिनय स्पर्धा:- प्रणाली भोंसले, नीलिमा मानधने व मीनाक्षी पाटील, शालिनी कोठावदे व मालती वाणी, पूजा साळी व इंदिरा साळी

कार्यक्रमावेळी उपस्थिती व परिश्रम
कार्यक्रमाचा वेळी नगर सेविका छाया दाभाड़े, डॉ राखी काबरा, शालिनी कोठावदे, मालती वाणी, इंदिरा साळी, शशिकला पांडे, प्रणाली भोसले, डॉ.प्रशांत पाटिल, रघुनाथ कोठावदे, प्रवीण महाजन यांच्यासह एरंडोल ग्राहक पंचायतीचे तालुका सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना शोभा साळी तर सूत्रसंचालन प्रणाली भोसले यांनी केले. आभार पुजा साळी यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशीला सोनार यांनी परिश्रम घेतले.

Protected Content