एसटी कर्मचार्‍यांना वेतनवाढीचा प्रस्ताव : वेळेत पगाराचेही आश्‍वासन

मुंबई प्रतिनिधी | संपावर असणार्‍या राज्यातील एसटी कर्मचार्‍यांना वेतनवाढीचा प्रस्ताव देण्यात आला असून यात वेळेवर पगार होणार असल्याची शाश्‍वती देखील देण्यात येणार आहे. जाणून घ्या सरकारने नेमकी कोणती ऑफर दिलेली आहे ती ?

एसटी महामंडळाचे राज्य शासकीय कर्मचारी म्हणून विलीनीकरण करावे यासह अन्य मागण्यांसाठी एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असली तरी कोणताही तोडगा निघालेला नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून सकारात्मक चर्चा होत असल्याने हा अडसर सूर होण्याची शक्यता बळावली आहे. यातच एसटी कर्मचार्‍यांच्या २८ संघटनांना एक प्रस्ताव देण्यात आलेला आहे.

या प्रस्तावानुसार एसटीच्या कर्मचार्‍यांना किमान ५ आणि कमाल साडे बारा हजार रूपयांची वेतनवाढ करण्यात येणार आहे. यात ज्यांना कमी वेतन त्यांना जास्त वेतनवाढ तर ५० हजारांपेक्षा जास्त पगार असणार्‍यांना तुलनेत कमी वाढ मिळणार आहे. दरम्यान, एसटीच्या कर्मचार्‍यांना वेळेत म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पाच ते दहा तारखेंच्या आत नियमित पगार करण्यात येणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेली आहे. हा प्रस्ताव देखील त्यांनीच कर्मचारी संघटनांना दिली असून यामुळे आता कर्मचारी हा प्रस्ताव मान्य करतात का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content