मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबीर जागतिक स्तरावर एकाच दिवशी मेगा ब्लड डोनेशन ड्राईव उपक्रमांतर्गत राबविण्यात आले. डॉ. उल्हास पाटील रक्तपेढी, ब्लड बँक सिव्हील हॉस्पिटल, संजीवनी ब्लड बँक दीपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले.
हे शिबिर गोदावरी हॉस्पिटल जळगाव खुर्द, भुसावळ, कुऱ्हापानाचे, मुक्ताईनगर, जामनेर, दीपनगर, खिर्डी बु. ता. रावेर येथे एकाचवेळी घेण्यात आले. जागतिक स्तरावर २००० रक्तदान शिबिराचा उददेश असून जवळपास दिड लाखाच्या वर रक्त संकलित करण्याचा प्रयत्न कोविड १९ नंतर अ.भा.ते. यु. परिषदेने नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त केला आहे. अखिल भारतीय तेरापंथी युवक परिषद भुसावळ शाखेतर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अभय छाजेड यांना दिली.