चोपडा येथे साहित्य संमेलनानिमित्त जागर आणि ग्रंथदिंडी

gajalkar

चोपडा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई व नगर वाचन मंदिर (तालुका वाचनालय) तर्फे आयोजित प्रथम जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य जागर आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहित करण्यासाठी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.

या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य व वाचन संस्कृतीचा जागर व्हावा, यासाठी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. दि.९ रोजी दुपारी ४ वाजता गांधी चौकातील ऎतिहासिक नगर वाचन मंदिरापासून ग्रंथदिंडी निघणार आहे. यावेळी ग्रंथपूजन जेष्ठ धन्वंतरी डॅा.विकास हरताळकर व डॅा.विजय पोतदार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ग्रंथदिंडीत प्रताप विद्या मंदिर, भगिनी मंडळ, विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार आहे. भजनी मंडळाच्या सुरेल गायनासह अनेक रसिक, साहित्यप्रेमी या ग्रंथदिंडीत सहभागी होतील.

गांधी चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, गोल मंदिर, बाजारपेठ, मेनरोड मार्गाने जावून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ग्रंथदिंडीचा समारोप होईल. गजलकार निफाडकरांचा दुग्धशर्करा योग दि.१० ला चोपड्यात साहित्य संमेलनानिमित्त साहित्यिकांची व साहित्य रसिकांची मांदियाळी अनुभवायला मिळणार आहे. त्यात साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी प्राख्यात गजलकार प्रदीप निफाडकर यांच्या सुश्राव्य गजल गायनाचा कार्यक्रम सांयकाळी ६ वाजता गांधी चौकातील अमरचंद सभागृहात होणार आहे.

ग्रंथदिंडीत सहभागी होण्याचे तसेच गजल गायन कार्यक्रमाला उपस्थिती देण्याचे आवाहन नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी, उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, डॅा.परेश टिल्लू यांच्यासह कार्यकारणीने केले आहे.

Protected Content