तौक्वे वादळातुन बचावलेल्या वैभव पाटील याचा वाघ परिवारातर्फे सत्कार

पाचोरा, प्रतिनिधी । शहरातील गोविंद नगरी येथील रहिवासी माधवराव पाटील यांचा एकुलता एक मुलगा वैभव पाटील (गोलु) मर्चन्ट नेव्ही, मुंबई येथे नौकरीला आहे. तो काही दिवसांपूर्वी  आलेल्या तौक्वे वादळातून सुखरूप घरी परतला असून त्याचा वाघ परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. 

वैभव पाटील हा  कंपनीच्या कामानिमित्त समुद्रमार्गे जहाजाव्दारे प्रवास करत असतांनाच तौक्वे चक्रीवादळमुळे त्यांचे जहाज समुद्रात अडकले होते.  या चक्रीवादळाशी सतत ८ तास संघर्ष करत एकप्रकारे मृत्युशी झुंज सुरु असतांनाच नशिब बलवत्तर म्हणून शेवटच्या क्षणी इंडियन नेव्हीचे जहाज त्यांच्याजवळ पोहचले व जहाजावर अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यात यश आले.  या नशिबवान प्रवाशांपैकी पाचोरा शहरातील माधवराव पाटील यांचा एकुलता एक मुलगा वैभव हा दोन दिवसांपूर्वी येथे घरी आल्याची शुभवार्ता माहीत पडताच पाचोरा शहराचे नगरसेवक तसेच पाचोरा तालुका शैक्षणिक संस्थेचे चेअरमन  संजय वाघ यांनी माधवराव पाटील यांच्या घरी जाऊन वैभव पाटील याचा सत्कार करुन विचारपूस केली व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संजय वाघ यांच्या सोबत हारुण देशमुख, शिक्षक राहुल पाटील, सुभाष गोसावी, आर. डी. पाटील, निलेश पाटिल व परिवारातील सदस्य आदी उपस्थित होते.

तौक्वे वादळात जहाज सापडल्यानंतर काय व कशी भयावाह परिस्थिती होती. समोर वादळाच्या रुपात प्रत्यक्ष यमदूत उभा ठाकला होता. आई, वडील परिवारातील सगळ्याचे चेहेरे डोळ्यासमोर येत होते. आपले जगणे आता शक्यच नाही असे वाटत होते. परंतु मला माझ्या काही चांगल्या कर्माचे फळ व आपल्या सारख्या मित्रांचा व जनतेचा आशिर्वाद कामी आला. देवाच्या कृपेने आम्ही वाचलो असे मत वैभव पाटील यांनी व्यक्त केले. परंतु वैभव पाटील यांनी घडलेला प्रसंगाचे वर्णन सांगतांना त्यांच्या चेहेऱ्यावरील बदलते हावभाव व पाणावलेले डोळे त्यावेळची परिस्थिती ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला होता.

 

Protected Content