Home Cities जळगाव जळगावचा राजा श्री नेहरू चौक मित्र मंडळातर्फे स्वागत रॅली (व्हिडीओ)

जळगावचा राजा श्री नेहरू चौक मित्र मंडळातर्फे स्वागत रॅली (व्हिडीओ)

0
115

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात सर्वत्र गणरायाच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे. या पार्श्वभूमीवर जळगावचा राजा श्री नेहरू चौक मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवाच्या आगमनानिमित्त शहरात दुचाकी स्वागत रॅली काढली. यावेळी गणरायाच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता.

जळगावचा राजा श्री नेहरू चौक मित्र मंडळातर्फे गणरायाच्या आगमनाची तयारीला जोरदार सुरूवात करण्यात आली आहे. यामध्ये मित्र मंडळाच्या वतीने आज रविवारी २८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरातून दुचाकीची स्वागत रॅली काढून सर्व परिसर गणरायाच्या घोषणांनी दणाणून सोडला होता.

रॅली नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, शिवतीर्थ मैदान, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, मु.जे. महाविद्यालय, रिंगरोड, गणेश कॉलनी, कोर्ट चौक आणि नेहरू चौक अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. या वेळी मंडळाच्या १५० सदस्यांनी रॅलीत सहभाग नोंदविला होता. मुंबई येथून गणपतीची मुर्ती आणण्यात आली आहे. यावेळी मंडळाच्या वतीने वाराणसी येथील श्री काशीविश्वेश्वर देखाव्याची आरास ठेवण्यात आली आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound