मुंबई वृत्तसंस्था | लहान मुलांच्या शाळा सुरु होत असतांना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहत आहे. मात्र पुढील सहा महिन्यात कोरोना लस विकसीत केली जाणार असून तीन वर्षाच्या पुढील मुलांनाही ही लस मिळणार असल्याची माहिती अदर पुनावाला यांनी दिली.
सीआयआय पार्टनरशिप सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित समिटमध्ये बोलतांना, पुढील सहा महिन्यात लहान मुलांसाठी कोरोना लस विकसीत केली जाणार असून तीन वर्षाच्या पुढील मुलांनाही कोरोना लस मिळणार असल्याची माहिती यांनी दिली.
ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरियंट दाखल झाल्यामुळे सर्वत्र सावधनता बाळगली जात असून कोरोना नियमावलीत बदल करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत 18 वर्षाच्या पुढील प्रत्येकाला लस देण्यात येत आहे. लहान मुलांच्या शाळा सुरु होत असतांना आणि घरातील लहान बालकांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहत आहे. सीआयआय पार्टनरशिप सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी समिटमध्ये बोलतांना, पुढील सहा महिन्यात लहान मुलांसाठी कोरोना लस विकसीत केली जाणार असून तीन वर्षाच्या पुढील मुलांनाही कोरोना लस मिळणार असल्याची माहिती यांनी दिली.