रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने माहिलेसह बालकाचे हाल

ambulance 1

 

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील रुग्णालयात आज दि. 9 ऑगस्ट रोजी रोटवड येथील महिला आपल्या 1 वर्षीय बाळाला घेऊन आली होती. परंतु डॉक्टर नसल्यामुळे पेशंटला जळगावला घेऊन जा असे सांगण्यात आले. यावेळी माहिलेने रुग्णवाहिकाचे 2 तास वाट पाहिली मात्र रुग्णवाहिका मिळालीच नाही. यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या या भोंगळ कारभाराला कोणी लक्ष देईल का ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थितीत होत आहे.

याबाबत माहिती अशी की, माहिलेने गेल्या 2 तासांपासून जळगाव रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकाची वाट पाहिली. मात्र रुग्णवाहिका आलीच नाही. याठिकाणी डॉक्टर नाही व त्या ठिकाणी तेथील कर्मचाऱ्यांनी त्याना सांगितले असता की या पेशन्ट ला जळगाव ला घेऊन जा तेथे त्याचा उपचार होईल असे त्याना सांगण्यात आले. त्या ठिकाणी त्यांना 2 तास ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिकेची वाट पाहावी लागली. मात्र त्या ठिकाणी त्यांना ती मिळाली नाही त्यांना गावातील युवासेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ ,सामाजिक कार्यकर्ते विजय महाजन गजानन महाजन यांनी त्यांना खाजगी गाडीची व्यवस्था करून दिली. धरणगाव ग्रामीण रुग्णालया हा भोंगळ कारभाराला कोणी लक्ष देईल का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थितीत होत आहे.

Protected Content