जगन्नाथ महाराज पुण्यतिथी महोत्सव उत्साहात

 

 

फैजपूर प्रतिनिधी | येथे ब्र. जगन्नाथ महाराज पुण्यतिथी महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

ब्रह्मलीन जगन्नाथ जी महाराज हे पूर्ण अंश होते आणि त्याचे दुसरे रूप म्हणजे जनार्दन हरीजी महाराज. गुरुशिवाय जीवनाला योग्य दिशा मिळणे केवळ अशक्य असून गुरु हे तत्व परमात्मा इतकेच सर्वव्यापी समसमान करुणासिंधू आहेत. परमेश्वराचा प्रसाद आपल्यापर्यंत पोहोचविणे हे संतांचे जीवन कार्य असते असे प्रतिपादन प. पू. अनंत श्री विभूषित श्रीमत् जगद्गुरु ज्ञानेश्वरदासजी महाराज प्रेरणापीठ पीराणा यांनी ब्र. जगन्नाथ महाराज पुण्यतिथी महोत्सव प्रसंगी आशिर्वचन देताना सांगितले. धर्मासाठी जगन्नाथ महाराज यांनी केलेले कार्य पूढे नेण्यासाठी महामंडलेश्‍वर जनार्दन आधीची महाराज समर्थ असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढत सांप्रदायिक सदभावाचे अभिनंदन केले.

येथील शुभ दिव्य मंगल कार्यालयातील भव्य व्यासपीठावर प.पू. प्रेमदासजी बापू अमेरिका, महामंडलेश्वर श्री पुरुषोत्तम दासजी महाराज, महंत मानेकर बाबा शास्त्री, शास्त्री भक्तीकिशोरदासजी, श्री श्याम चैतन्यजी महाराज गुरुदेव सेवाश्रम जामनेर, प. पू. कृष्णगिरी महाराज सावदा, भरतदासजी महाराज कुसुंबा, हभप रविंद्र महाराज हरणे मुक्ताईनगर, ब्रह्मकुमारी शकुंतला दीदी, श्रद्धेय नागाजी महाराज वृंदावन, धनराज महाराज अंजाळेकर, हभप शामदासजी महाराज उटखेडा, श्री कन्हैया जी महाराज आमोदा आदी संत-महंत व्यासपीठावर उपस्थित राहून त्यांनी गुरुभक्ती सोबत धर्मप्रेम, राष्ट्र प्रेमाविषयी जागृत राहण्याची महत्व विशद केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागतपर प्रस्तावनेत महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी ब्रह्मलीन जगन्नाथ जी महाराज यांचे जीवन आमच्यासाठी आदर्श असल्याचे प्रतिपादन केले. आचार्यांच्या आचरणात ब्रह्म तत्त्व जाणवत होते. सतपंथासाठी, हिंदू धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी आपले पूर्ण जीवन समर्पित केले. त्यांनी हे कार्य केले नसते तर महाराष्ट्रात सतपंथ उदयास आला नसता. त्यांचे सांप्रदायिक सदभावाचे यांचे कार्य पुढे नेण्याची प्रेरणाही मिळाली नसती. त्यांच्या आचार विचारांचे पालन करणे हीच खरी गुरुदेवांना आदरांजली ठरेल असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

दोन दिवसीय या कार्यक्रमात पहिल्या दिवशी सतपंथ मंदिर संस्थान येथे महापूजा तसेच दिनांक 14 रोजी सकाळी मंदिराच्या बुधवारच्या त्यांच्यावर जगन्नाथ जी महाराजांच्या समाधीचे वैदिक पद्धतीने पूजन करून जगद्गुरु ज्ञानेश्वर दास जी महाराज यांना रथात बसवून नामसंकीर्तन टाळ मृदुंग यांच्या जयघोषात, ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून कार्यक्रम स्थळी सन्मानाने आणले गेले. दीपप्रज्वलन व गुरु पादुका पूजन करून जगद्गुरुची केळी तुला करण्यात आली. या कार्यक्रमाचे यजमान प्रमोद दुलीचंद किरंगे यांनी सपत्नीक या पादुकांची पूजन केले. या कार्यक्रम प्रसंगी मुंबईचे उद्योगपती प्रवीणभाई, आ. शिरीष चौधरी, आ. राजूमामा भोळे, जि प अध्यक्ष रंजनाताई पाटील, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, नंदकिशोर महाजन, नरेंद्र नारखेडे, नगराध्यक्ष महानंदा रवींद्र होले, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, यासह अनेक भक्तगण उपस्थित होते. कोरोनाच्या नियमांचे पालन करून या छोटेखानी मात्र भव्य दिव्य संत महंतांच्या उपस्थितीने फैजपूर नगरीत नवचैतन्य निर्माण झाले. मुस्लिम समाजातर्फे फेसबुक नगरपालिकेतील गटनेता शेख कुर्बान यांनी जगद्गुरुंचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. सतपंथ संस्थानचे सर्व मुखीगण, युवा कार्यकर्ते, भजनी मंडळ यांनी अतिशय शिस्तबध्द नियोजन, परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केल्याने जगद्गुरु ज्ञानेश्वरदासजी महाराजांनी आनंद व्यक्त केला.

Protected Content