राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेला शानदार सुरुवात

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नासिकचे संघ उपांत्य फेरीत दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धचे श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात सुरुवात झाली आहे. माजी खा. डॉ. उल्हासदादा पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी फुटबॉलला किक मारून व नाणे फेक करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष तथा गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हासदादा पाटील यांनी क्रीडांगण पूजन केले. यावेळी नाशिक विभागाच्या क्रीडा संचालिका सुनंदा पाटील, प्रशिक्षणार्थी जिल्हा अधिकारी अर्पित चव्हाण, जैन इरिगेशनचे अनिल जोशी, पिंचं बॉटेलिंग एमडी जाफर शेख, जळगाव स्पोर्ट्सचे आमीर शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण, फुटबॉल संघटनेच्या उपाध्यक्ष प्राध्यापिका डॉक्टर अस्मिता पाटील, कार्याध्यक्ष प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे, सचिव फारुख शेख, सहसचिव अब्दुल मोहसीन शिवछत्रपती अवॉर्डी अंजली पाटील,जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात व किशोर चौधरी आदींची उपस्थिती होती.

प्रास्ताविक सुनंदा पाटील यांनी सादर केले. सूत्रसंचालन फारुक शेख तर आभार गुरुदत्त चौहान यांनी मानले. सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू दीपिका पॉल (नाशिक),लिखित जैन (नाशिक), सोड्यम ब्रु (पुणे) वैष्णवी बोरकर (औरंगाबाद) सकिना बॉक्सवाला (मुंबई), रियान युनियल (मुंबई) कृतिका राऊत (नागपूर) यांना जफर शेख,मनोज सुरवाडे,वाल्मीक पाटील, मजहर पठाण, अनिस शाह, गुरुदत्त चौहान, डॉ वृषाली पाटील, सुनंदा पाटील यांचे हस्ते मेडल देण्यात आले.

Protected Content