आता शिधापत्रिकाधारकांना मिळणार ऑनलाईन ई- शिधापत्रिका

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शासनाच्या आदेशान्वये लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत राज्यातील शिधापत्रीका धारकांना आता ई-शिधापत्रीका मिळणार आहे . व्यवस्थापन प्रणाली मार्फत ऑनलाईन ई -शिधापत्रिका वितरण कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली, असल्याची माहिती महसुल प्रशासनाच्या पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत विकसित व्यवस्थापन प्रणाली मार्फत आरसीएमएस शिधा पत्रिका लाभार्थ्यांना क्यु आर कोड आधारीत ई -शिधापत्रिका तसेच ऑनलाईन तसेच डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . या नविन व्यवस्थापन प्रणाली मुळे यावल तालुक्यातील अंत्योदय योजने अंतर्गत अन्नधान्य मिळवणारे १० हजार ६५१ शिधापत्रीका असुन ४५ हजार७२५ लाभार्थी संख्या आहे . प्राधान्य शिधापत्रिका धारकांची संख्या ३० हजार असुन जात लाभार्थी संख्या ही ४८ हजार ८२५ आहेत तर एनपीएच शिधापत्रिका धारक संख्या १४ हजार ९९३ असुन यातील लाभार्थी संख्या ५५ हजार ९५५ अशी असुन यावल तालुक्यातील एकुण शिधापत्रिका धारक ५६ हजार१२७ अशी संख्या आहे.

यावलच्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात पुरवठा निरक्षण अधिकारी कु अर्चना भगत आणी पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन वाय डी पाटील, पुरवठा विभागाचे संगणक कर्मचारी प्रविण माळी आणी शेख नासीर यांच्या उपस्थित मोहराळा गावातील अशोक अडकमोल या लाभार्थ्यास ई – शिधापत्रिका देण्यात आली.

Protected Content