कोळी समाज बांधवांचा उद्या अकलुद येथे रास्ता रोको आंदोलन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हाधिकारी यांच्या कार्यालया समोर मागील १० ऑक्टोबरपासून आदिवासी कोळी समाज बांधवांचे जमातीचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता मिळविण्यासाठी १८ दिवसापासून अन्नत्याग सत्याग्रह आमरण उपोषण सुरू आहे.

या आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने यावल तालुक्यातील अकलुद येथील कोळीसमाज बांधव उद्या शनीवारी २८ ऑक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत पोलीसांना निवेदन देण्यात आले.

सकाळी ११ वाजता यावल तालुक्यातील अकलुद गावातील तापी पुलाजवळ तोटनाका परिसराजवळ आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी रस्ता रोको करण्यात येणार असल्याचे निवेदन समाज बांधवानी फैजपुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघ यांना दिले आहे.

या निवेदनावर  दिलीप कोळी ,योगेश कोळी, अजय सपकाळे, नंदकीशोर सोनवणे, धनराज सपकाळे, बंडु कोळी, विनोद झाल्टे, अनिल सपकाळे, संदिप सोनवणे, राहुल तायडे, विकास सपकाळे, नितीन सोनवणे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content