साहित्य कट्टयात मातृत्वाचा गौरव

जळगाव प्रतिनिधी । शहरातील व.वा. वाचनालयाच्या साहित्य कट्टयामध्ये जागतिक मातृदिनानिमित्त मातृत्वाचा गौरव करण्यात आले.

व. वा. साहित्य कट्टयात आर. डी. कोळी यांनी फ. मु. शिंदे यांची गाजलेली आई ही कविता गायली. किशोर नेवे यांनी मीनाक्षी निकम यांच्या व्यथा या काव्यसंग्रहाबाबत विवेचन केले. श. मु. चौधरी यांनी मंगेश पाडगावकर यांच्या काव्यसंग्रहातील कवितांचे वाचन केले. भास्करराव चव्हाण यांनी मतो हा पांडुरंगफ या पुस्तकावर माहिती दिली. याशिवाय, राजेश खोडके, अरुणकुमार जोशी, गजानन भट, संतोष मराठे, प्रदीप गुजराथी यांनी चर्चेत भाग घेतला.

Add Comment

Protected Content