मुख्यमंत्री निवडीसाठी आज भाजपची बैठक

डेहरादून वृत्तसंस्था | उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी नवीन मुख्यमंत्री नेमण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची बैठक आयोजीत करण्यात आली आहे.

तीरथसिंह रावत यांनी काल रात्री आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे उत्तराखंडमधील राजकीय घडामोडी गतीमान झाल्या आहेत. त्यांना विधानसभेत निवडून येण्यासाठी अडचणी निर्माण झाल्यामुळे रावत यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. तथापि, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगला चेहरा हवा यासाठी त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, रावत यांचा उत्तराधिकारी नेमण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची निवड होत आहे. या बैठकीमध्ये उत्तराखंडच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होण्याची शक्यता आहे. यामुळे आता मुख्यमंत्रीपदी नेमकी कुणाची वर्णी लागते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content